Cheese Use : विविध पदार्थांत वाढतोय चीजचा वापर ; चिज उत्पादनात वाढत्या संधी

Team Agrowon

आपल्या देशामध्ये प्रामुख्याने प्रक्रियायुक्त चीज, स्प्रेड चीज आणि विशिष्ट चवीचे चीज वापरले जाते.

Cheese Use | Agrowon

साधारणपणे मोझारेल्ला,चेडर,एमेंटल,रिकोटा हे लोकांना आवडलेले चीजचे प्रकार आहेत. आपल्या डेअरी उद्योगांना चीज निर्मितीमध्ये संधी आहे.

Cheese Use | Agrowon

चीजमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रथिने, कॅल्शिअमसारखी खनिज द्रव्ये आणि जीवनसत्त्वे आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हा शुद्ध शाकाहारी पदार्थ आहे. 

Cheese Use | Agrowon

स्वयंपाक किंवा अल्पोपाहारामध्ये जसे की सॅंडवीचमध्ये पसरून किंवा स्नॅक्स सजवण्यासाठी चीज वापरले जाते.

Cheese Use | Agrowon

ड्राय चीज हे बेकरी उत्पादने, पास्ता, बिस्किटे आणि तयार जेवणामध्ये वापरतात. 

Cheese Use | Agrowon

देशांतर्गत शहरी भागात ब्रेड, पाव यांच्याबरोबर चीज खाल्ले जाते, परंतु त्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

Cheese Use | Agrowon

मुंबई, दिल्ली, कोलकता, चेन्नई या शहरांमध्ये डोसा, पावभाजी, पराठ्यामध्ये  मर्यादित स्वरूपात चीजचा वापर सुरू झाला आहे. 

Cheese Use | Agrowon

आपल्या देशामध्ये प्रामुख्याने प्रक्रियायुक्त चीज, स्प्रेड चीज आणि विशिष्ट चवीचे चीज वापरले जाते. साधारणपणे मोझारेल्ला,चेडर,एमेंटल,रिकोटा हे लोकांना आवडलेले चीजचे प्रकार आहेत.  

Cheese Use | Agrowon

आज मोठ्या सुपर मार्केट सह छोट्या शहरातील दुकानातून चीज क्यूब,ब्लॉक्स,लिक्विड आणि चौकोनी तुकड्यात चीज उपलब्ध झाले आहेत. सॅंडविच, पिझ्झा, बर्गर यामध्ये  मोठ्या प्रमाणामध्ये चीजचा वापर वाढला आहे. 

Cheese Use | Agrowon