Kasuri Methi : कसुरी मेथी साध्या मेथीपेक्षा वेगळी कशी?

Team Agrowon

कसुरी मेथी (Trigonella conriculata L.) हे पीक बिहार व राजस्थानच्या उत्तरी भागात घेतले जाते.

Kasuri Methi | Agrowon

या पिकाकरिता थंड हवामानाची गरज भासते. त्यामुळे ऑक्‍टोबरमध्ये (रब्बी हंगामात) याची लागवड होते.

Kasuri Methi | Agrowon

मसालावर्गीय पिकात मसाले बियाणे पीक म्हणून याचा अंतर्भाव होतो. राष्ट्रीय स्तरावर "पुसा कसुरी'' हे वाण यापूर्वी प्रसारित झाले असून, याशिवाय इतर वाण विशेष प्रसिद्ध नाहीत.

Kasuri Methi | Agrowon

कसुरी मेथीच्यापानाला विशिष्ट सुगंध असल्याने मसाला व मांसाहारी भाज्यांमध्ये याच्या वाळलेल्या पानाचा उपयोग केला जातो.

Kasuri Methi | Agrowon

साध्या मेथीपेक्षा याचे बियाणे लहान आकाराचे राहते. एकरी ४०० ते ५०० ग्रॅम बियाण्यांची गरज भासते. कसुरी मेथीला मागणी आहे.

Kasuri Methi | Agrowon

वाळलेल्या पानांचा हिरवा रंग कायम राहणे गरजेचे असते. अशा पानांना बाजारात मागणी असते

Kasuri Methi | Agrowon

कसुरी मेथीची पाने साध्या मेथीपेक्षा कडू असतात. त्यामुळे हिरवी पाने तोडून उकळत्या पाण्यामध्ये १ ते २ मिनिटे सोडली जातात. नंतर पाण्यातून काढत ती सावलीत दोन ते तीन दिवस वाळविली जातात.

Kasuri Methi