Anuradha Vipat
कोथिंबीर हा प्रत्येक महाराष्ट्रीयन स्वयंपाकाचा स्वाद वाढवणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे.
कोथिंबीर महिनाभर अगदी ताजी, हिरवीगार आणि सुगंधी ठेवण्यासाठी स्वयंपाकघरातील काही सोप्या आणि प्रभावी पद्धती वापरणे अत्यंत गरजेचे आहे.
बाजारातून कोथिंबीर आणल्यानंतर सर्वात आधी तिची मुळं कापून टाका. जुडीमधील सर्व पिवळी, काळी किंवा कुजलेली पाने निवडून वेगळी करा.
कोथिंबीर पूर्णपणे कोरडी असावी . एक प्लास्टिक किंवा काचेचा एअरटाईट डबा घ्या. त्याच्या तळाशी टिश्यू पेपर किंवा सुती कापड ठेवा. त्यावर कोथिंबीर ठेवून वरून पुन्हा दुसरा टिश्यू पेपर ठेवा आणि डब्याचे झाकण घट्ट लावून फ्रिजमध्ये ठेवा.
जर तुम्हाला कोथिंबीर चिरून ठेवायची नसेल, तर एका काचेच्या पेल्यात किंवा बरणीत थोडे पाणी भरा. कोथिंबीर न धुता तिची मुळे त्या पाण्यात बुडवून ठेवा
कोथिंबीर स्वच्छ धुवून, फॅनखाली पूर्णपणे वाळवून घ्या. नंतर ती बारीक चिरून मिक्सरमध्ये पाणी न घालता थोडं मीठ आणि १ चमचा तेल घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट आईस ट्रेमध्ये ठेवून क्यूब्स बनवा आणि फ्रीझरमध्ये झिपलॉक बॅगमध्ये ठेवा.
कोथिंबीर साठवताना तिला पाणी अजिबात लागलेले नसावे. ओलेपणामुळे कोथिंबीर २४ तासांच्या आत कुजू लागते.