Food Timings Matter : कधी काय खायचं हे पण करतं मॅटर! चुकीच्या वेळी खाल्लेलं सकस अन्नही ठरेल आरोग्यासाठी घातक

Anuradha Vipat

नुकसान

कधी काय खायचं हे पण खूप मॅटर करतं. कारण चुकीच्या वेळी खाल्लेले सकस अन्नही शरीराला फायद्याऐवजी नुकसान पोहोचवू शकते.

Food Timings Matter | Agrowon

सकाळी काय खावे

सकाळी भिजवलेले बदाम/अक्रोड, केळी, ओट्स, पोहे, उपमा किंवा अंडी खाणे सर्वोत्तम मानले जाते. याने शरीराला दिवसभरासाठी भरपूर ऊर्जा मिळते.

Food Timings Matter | Agrowon

सकाळी काय टाळावे

रिकाम्या पोटी चहा, कॉफी, जास्त तिखट किंवा तळलेले पदार्थ आणि लिंबूवर्गीय आंबट फळे खाणे टाळावे. यामुळे ॲसिडिटी आणि पोटात जळजळ होऊ शकते.

Food Timings Matter | agrowon

दुपारी काय खावे

दुपारच्या जेवणात वरण-भात, चपाती, भाजी, कोशिंबीर आणि ताक असा पूर्ण आहार घ्यावा.

Food Timings Matter | Agrowon

दुपारी काय टाळावे

दुपारच्या जेवणानंतर लगेच चहा पिणे किंवा भरपूर थंड पाणी पिणे टाळावे. यामुळे पचनक्रिया मंदावते.

Food Timings Matter | Agrowon

संध्याकाळी काय खावे

संध्याकाळी ४ ते ६ च्या दरम्यान हलकी भूक लागल्यास मखाने, भाजलेले चणे, मोड आलेले कडधान्य किंवा एखादे फळ खावे.

Food Timings Matter | Agrowon

संध्याकाळी काय टाळावे

संध्याकाळच्या वेळी चहा-बिस्कीट, सामोसा, वडापाव किंवा बेकरी प्रॉडक्ट्स जास्त प्रमाणात खाणे टाळावे.

Food Timings Matter | agrowon

Magic Of Acupressure : शरीराचे 'हे' भाग दाबा आणि औषधांशिवाय पळवून लावा गंभीर आजार!

Magic Of Acupressure | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...