Anuradha Vipat
आपल्या शरीरावर असे काही विशिष्ट बिंदू असतात, ज्यांना विशिष्ट पद्धतीने दाबल्यास रक्तप्रवाह सुधारतो आणि अनेक आजारांमध्ये त्वरित आराम मिळतो.
हाताचा अंगठा आणि तर्जनी यांच्यामधील मऊ, मांसल भागावर हा बिंदू असतो. या बिंदूवर २ ते ३ मिनिटे गोलाकार मसाज केल्याने डोकेदुखी, मायग्रेन, मानसिक तणाव आणि दातांचे दुखणे कमी होते.
गुडघ्याच्या वाटीच्या खाली, बाहेरील बाजूला चार बोटे खाली हा बिंदू असतो. या बिंदूला दाबल्याने पचनशक्ती वाढते, गॅस, पोटफुगी, बद्धकोष्ठता दूर होते.
कानाच्या मागे, मानेच्या हाडापाशी हा बिंदू आढळतो. रात्री झोपण्यापूर्वी हा बिंदू हलक्या हाताने दाबल्यास अनिद्रा, अस्वस्थता आणि चिंता दूर होऊन शांत झोप लागते.
हाताच्या मनगटापासून खाली तीन बोटे सोडून, दोन शिरांच्या मध्ये हा बिंदू असतो. प्रवास करताना होणारी मळमळ, उलट्या, ॲसिडिटी किंवा छातीत होणारी जळजळ या बिंदूवर दाब दिल्याने लगेच थांबते.
ॲक्युप्रेशर करताना बिंदूवर मध्यम दाब द्यावा, ज्यामुळे वेदना होणार नाहीत.
गरोदर महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही प्रेशर पॉईंट्स दाबू नयेत, कारण यामुळे गर्भाशयावर परिणाम होऊ शकतो.