Swarali Pawar
हा एक विषाणूजन्य रोग असून पांढऱ्या माशीमार्फत पसरतो. पेरणीनंतर २५-३० दिवसांनंतर याची लक्षणे दिसू लागतात. पेरणीनंतर ७५ दिवसांपर्यंत हा रोग पिकास धोकादायक ठरु शकतो.
पाने अर्धवट हिरवी आणि अर्धवट पिवळी होतात. शेंड्याकडील पाने लहान आणि पिवळी होतात. पिकाची वाढ खुंटते आणि अन्ननिर्मितीमध्ये अडथळा येतो.
सोयाबीन पिकाला फुलोरा येण्यापूर्वी प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात ९०% पर्यंत घट होऊ शकते.
रोग प्रतिकारक वाणांची निवड जसे (JS 97-52), वेळेवर पेरणी (जूनचा तिसरा आठवडा ते जुलैचा दुसराआठवडा), तण व झाडे साफ करणे, रोगट रोपे उपटून टाकणे या पारंपरिक उपायांतून रोगावर प्रतिबंध घालता येतो.
सोयाबीनच्या शेतात हेक्टरी २२-२३ पिवळे चिकट सापळे लावावेत जेणेकरून पांढऱ्या माशींचा प्रसार रोखता येईल.
निंबोळी अर्क (५%) किंवा ॲझाडिरॅक्टिन (१००० PPM) हे २-३ मि.ली. प्रती लिटर पाण्यात मिसळून २० व ३५ दिवसांनी फवारणी करावी.
नत्राचा अति वापर टाळा. पांढऱ्या माशींसाठी बीटा सायफ्लुथ्रीन + इमिडाक्लोप्रिड (०.७ मि.ली.) किंवा थायामेथोक्झाम + लॅंबडा सायलोथ्रीन (०.२५ मि.ली.) किंवा क्लोरॲन्ट्रनिलीप्रोल + लॅंबडा सायलोथ्रीन (०.४ मि.ली.) यापैकी एक संयुक्त कीटकनाशक वापरावे
पिवळा मोझाईक रोखण्यासाठी लवकर निदान, योग्य फवारणी आणि स्वच्छ शेती व्यवस्थापन खूप महत्त्वाचे आहे. वेळेवर उपाय केल्यास उत्पादन वाचवता येते.