Soybean Pest Management: सोयाबीनवरील पाने खाणाऱ्या अळीवर तातडीने आळा घाला; बंदोबस्तासाठी सोपे उपाय!

Swarali Pawar

स्पोडोप्टेरा लिटुरा/ पाने खाणारी अळी

ही अळी केवळ सोयाबीनच नाही तर झेंडू, भेंडी, कोबीसारख्या पिकांनाही हानी पोहोचवते.

Spodoptera Litura | Agrowon

अळीचे जीवनस्थर

अंडी, अळी, कोष, पतंग अशा चार अवस्था असतात. एक मादी २५०-३०० अंडी देते. अळ्या रात्रभर पानांवर ताव मारतात.

Lifespan of Larvae | Agrowon

पारंपरिक उपाय

अळ्यांसहित जाळीदार पाने गोळा करून रॉकेलमिश्रीत पाण्यात टाकावीत. एरंडी झाडांचा वापर सापळा पीक म्हणून करावा.

Traditional Methods | Agrowon

कामगंध सापळ्यांचा वापर

प्रत्येक हेक्टरसाठी ५ कामगंध सापळे लावावेत. पतंग अडवण्यासाठी हा प्रभावी उपाय आहे.

Pheromome Trap | Agrowon

विषाणूजन्य कीटकनाशक

एस. एल. एन. पी. व्ही. हे विषाणूजन्य कीडनाशक १० मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास अळ्यांच्या शरीरात विषाणू पसरून त्यांचा नाश होतो.

Spraying Natural Insecticides | Agrowon

बिव्हेरिया आणि नोमुरिया बुरशी

बिव्हेरिया बॅसियाना व नोमुरिया रिलेई या बुरशी अळ्यांमध्ये रोग निर्माण करून त्यांचा नाश करतात.

Effect of Natural Fungicides | Agrowon

रासायनिक नियंत्रण

डायफलोव्हास ७६% EC किंवा एन्डोक्झार्काब १५.८% EC हे कीटकनाशक ६.६ मि.ली. १० लिटर पाण्यातून फवारावे.

Spraying in Soybean crop | Agrowon

अळी नियंत्रणाची गुरुकिल्ली

सुरुवातीपासून पिकांचे निरीक्षण, योग्य जैविक, यांत्रिक व रासायनिक पद्धतींचा समन्वय म्हणजे यशस्वी अळी नियंत्रण.

Soybean Field | Agrowon

Crop Management in Uneven Rainfall: कमी किंवा जास्त पावसात पिकांची काळशी कशी घ्यावी? पहा संपूर्ण माहिती

Uneven Rainfall | Agrowon
अधिक माहितीसाठी...