Horse Exhibition : सर्वात उंच घोडा ठरला हिवरगाव अश्व प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण

Mahesh Gaikwad

खंडोबाची यात्रा

नगर जिल्ह्यातील हिवरगाव पावसा येथील ग्रामदैवत खंडोबाची दरवर्षी यात्रा भरते. गेल्या सात वर्षांपासून यात्रेत अश्व प्रदर्शनाची परंपरा सुरू झाली आहे.

Horse Exhibition | Agrowon

अश्व प्रदर्शनाची ख्याती

कमी कालावधितच या अश्व प्रदर्शनाची ख्याती देशभर पसरली आहे. यात्रेमध्ये महाराष्ट्रासह विविध राज्यातील अश्व सहभागी होतात.

Horse Exhibition | Agrowon

अश्व संवर्धन

यात्रेतील अश्व प्रदर्शनामुळे अश्वपालनासह घोड्यांच्या विविध जातींच्या संवर्धनालाही चालना मिळाली आहे.

Horse Exhibition | Agrowon

अश्वपालन

शेतीला पूरक अशा अश्वांच्या पालनासाठी शेतकऱ्यांना प्रेरित करण्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रदर्शनाला प्रोत्साहन दिले.

Horse Exhibition | Agrowon

सर्वात उंच घोडा

महाराष्ट्रासह पंजाब, राजस्थान, गुजरात या भागातील अश्वप्रेमी आपल्या अश्वांसह या प्रदर्शनामध्ये सहभागी होतात. 'बी जस्पर' हा सर्वात उंच घोडा प्रदर्शनामध्ये सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता.

Horse Exhibition | Agrowon

अश्व प्रजाती

या अश्व प्रदर्शनामध्ये मारवड, सोनपुरी, सिंधी, पंजाबी, काठेवाडी यासारख्या अनेक अश्व प्रजाती पाहायला मिळतात.

Horse Exhibition | Agrowon

अश्व स्पर्धा

या प्रदर्शनात सहभागी होणारे अश्व आणि त्यांच्या स्पर्धा पाहण्यासाठी येणाऱ्या शेतकरी आणि अश्वप्रेमींची संख्याही मोठी असते.

Horse Exhibition | Agrowon

अश्व खरेदी-विक्री

या प्रदर्शनामध्ये अश्वांच्या स्पर्धेशिवाय अश्वांची खरेदी-विक्रीसुध्दा होते. तीन लाखांपासून कोटींपर्यंत येथे अश्वााला दर मिळतो.

Horse Exhibition | Agrowon
Bhimthadi Horse | Agrowon