Mahesh Gaikwad
शरीराच्या चांगल्या वाढीसाठी संतुलित आहार आवश्यक आहे. शरीराच्या वाढीमध्ये जीवनसत्त्वांची भूमिका महत्त्वाची असते.
शरीराची व्हिटामिन-सी'ची गरज भरून काढण्यासाठी आवळा हा सर्वात उत्तम स्त्रोत आहे.
दररोज आवळा खाल्ल्याने शरीराची व्हिटामिन-सी'ची कमतरता तर भरून निघतेच, पण शरीराच्या अनेक समस्याही दूर होतात.
आवळ्यामध्ये लोह, कॅल्शियम, अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. रोज आवळा खाल्ल्यास शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते.
आवळा खाल्ल्याने शरीरात व्हिटामिन-सी'चे प्रमाण वाढते, ज्यामुळे सर्दी, खोकला, फ्लू यांसारख्या संसर्गजन्य आजारांपासून बचाव होतो.
आवळा खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी आवळा उत्तम आहे.
आवळा खाल्ल्याने केस मजबूत, घनदाट आणि काळभोर होतात. तसचे आवळ्यामुळे त्वचेवर नितळपणा येतो आणि वृद्धत्वाच्या सुरकुत्याही कमी होतात.
आवळ्यात असणारे फायबर आणि अॅसिड यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. परिणामी अन्न सहज पचते आणि अपचन, गॅस, अॅसिडिटीपासून आराम मिळतो.