Aslam Abdul Shanedivan
आपल्या देशात पुर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण बासमती तांदूळ घरात, कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात वापरला जातो. बासमती तांदळास तांदळांचा राजा असे म्हटले जाते.
बासमती तांदळाचा प्रवास हा पाकिस्तानातून सुरू होतो. जो १३४ वर्षांचा आहे. तर याचा दिल्लीच्या लाहोरी गेटपासून खरा प्रवास सुरू होतो.
१८८९ मध्ये खुशी राम आणि बिहारी लाल या दोन भावांनी लायलपूरमध्ये तांदूळ, तेल आणि गहू यांचा छोटासा व्यवसाय सुरू केला.
फाळणीनंतर खुशी राम आणि बिहारी लाल हे भारतात आले आणि दिल्लीच्या लाहोरी गेटपासून नव्या व्यवसायाला सुरूवात केली.
दोघांनी केआरबीएल नावाची कंपनी स्थापन करून तांदूळ, डाळी, तेल विकायला सुरुवात केली. त्यांना यश बासमती तांदूळाने मिळवून दिले आणि बासमती तांदूळ एक मोठा ब्रँड बनला.
बासमती तांदळाचा अर्थ इंडिया गेट बासमती तांदूळ म्हणून ओळखला जातो. इंडिया गेट राइस ब्रँडचा बासमती तांदूळ लोकांना इतका आवडला आहे की तो प्रत्येक घराघरात पोहोचला आहे.
इंडिया गेटने ९५ हजार शेतकऱ्यांना स्वतःसोबत जोडले आहे. कंपनीकडे १४ प्रकारचे ब्रँड तांदूळ असून भारतातील ५०० हून अधिक डीलर्स आणि वितरक हे केआरबीएलशी जोडले गेले आहेत.