Aslam Abdul Shanedivan
देशभरात अनेक ठिकाणी कुकूटपालन केलं जातं. सध्या कोंबडी, बदक आणि इतर पक्षी पाळले जात आहेत.
पण यात आता नव्या पक्षाची भर पडली आहे. जे कोंबडी, बदकापेक्षा अधिक नफा मिळवून देते. ते म्हणजे जपानी बटेर पक्षी.
जपानी बटेर पालन हे ब्रॉयलर पोल्ट्रीच्या तुलनेत कमी जागेत चांगले होते. त्याला धान्य आणि पाणी देखील कमी लागते. त्यामुळे छोट्या गुंतवणुकीतून मोठा नफा मिळतो.
बटेर पालन व्यवसायात जोखीम, खर्च कमी, नफा अधिक असतो. मार्केटिंगमध्ये कोणतीही अडचण येत नसल्याने मागणीत वाढ
बटेर पक्ष्याचे मास हे ब्रॉयलर, कोंबडी आणि बदकाच्या तुलनेत चांगले आहे. त्यामुळे त्याला बाजारात जास्त किंमत आहे.
जपानी बटेर पक्षी भारतात सहज पाळता येतो. बटेर पक्षी हा 5 आठवड्यांत तयार होतो. तर तो 60 ते 80 रुपयांना विकला जातो. तर पक्षी तयार करण्याचा खर्च अर्धा आहे. त्यामुळे यात ५० टक्के नफा मिळतो.
शेतीसोबतच बटेर पालनामुळे घरातील आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते. त्यामुळे याच्याबाबत अधिक माहिती हवी असेल तर केंद्रीय पक्षी संशोधन केंद्राशी संपर्क करू शकता.