Anuradha Vipat
भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध कसा केला? यामागे पराक्रम, भक्ती आणि स्त्री-शक्तीचा एक अनोखा इतिहास दडलेला आहे.
नरकासुराचा वध मुख्यत्वे नरक चतुर्दशी (दिवाळीचा दुसरा दिवस) या दिवशी झाला होता.
नरकासूर हा प्राग्ज्योतिषपूर राज्याचा बलाढ्य राजा होता. तो भूदेवी आणि वराह देवाचा पुत्र होता.
त्याने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या करून एक अनोखे वरदान मिळवले होते—"माझा मृत्यू केवळ माझ्या मातेच्या हातूनच व्हावा." या वरदानामुळे तो अमर झाल्यासारखाच वागू लागला.
आपल्या शक्तीच्या मदात त्याने तिन्ही लोकांवर ताबा मिळवला. त्याने स्वर्गाचा राजा इंद्रदेवावर हल्ला करून त्यांची आई अदिती यांची अमूल्य कुंडल हिरावून घेतली.
एवढेच नव्हे तर, त्याने १६ हजार रूपवान राजकन्यांना पळवून आणून आपल्या महालात कैदेत ठेवले होते.
सत्यभामेने तात्काळ धनुष्यबाण हातात घेतला आणि नरकासुरावर अचूक बाण चालवला. सत्यभामा हीच भूदेवीचा अवतार असल्याने, तिच्या हाताने सुटलेला तो बाण नरकासुरासाठी काळ ठरला. नरकासूर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.