Shenachya Gavlani : दिवाळीत शेणाच्या गवळणी का मांडतात? जाणून घ्या धार्मिक रहस्य

Anuradha Vipat

जुनी परंपरा

महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृतीत आणि विशेषतः दिवाळी पाडव्याच्या दिवशी अंगणात किंवा गोठ्यात गाईच्या शेणाच्या गवळणी , कृष्ण आणि गोवर्धन पर्वत मांडण्याची जुनी परंपरा आहे.

Shenachya Gavlani | agrowon

धार्मिक इतिहास

हा केवळ एक सण नसून यामागे निसर्गपूजा, पशुधनाचा आदर आणि द्वापारयुगातील एक मोठा धार्मिक इतिहास जोडलेला आहे.

Shenachya Gavlani | agrowon

श्रीकृष्ण आणि गोवर्धन पूजा

इंद्रदेवाच्या कोपामुळे जेव्हा गोकुळावर मुसळधार पाऊस पडत होता, तेव्हा गोकुळवासीयांचे आणि मुक्या जनावरांचे रक्षण करण्यासाठी श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलला होता.

Shenachya Gavlani | agrowon

गायींची पूजा

इंद्रदेवाचा अहंकार गळून पडल्यानंतर, श्रीकृष्णाने गोकुळवासीयांना निसर्गाची, डोंगराची आणि गायींची पूजा करण्यास सांगितले.

Shenachya Gavlani | agrowon

प्रतीक

तेव्हापासून दिवाळी पाडव्याला गोवर्धन पर्वताचे प्रतीक म्हणून शेणाचा पर्वत आणि गोकुळातील गोपींच्या आठवणीत शेणाच्या गवळणी मांडल्या जातात.

Shenachya Gavlani | agrowon

श्रद्धा

हिंदू धर्मात गाईला 'गोमाता' मानले जाते आणि तिच्या शरीरात ३३ कोटी देवतांचा वास असतो अशी श्रद्धा आहे.

Shenachya Gavlani | agrowon

शेणाच्या गवळणी

गाईचे शेण अत्यंत पवित्र आणि शुद्ध मानले जाते. दिवाळीच्या दिवसांत शेणाच्या गवळणी बनवून त्यांची पूजा केल्याने घरातील आणि गोठ्यातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो

Shenachya Gavlani | agrowon

Diwali Amavasya 2026 : बदलून जाईल तुमचे नशीब; अमावस्येच्या दिवशी करा 'हे' महादान!

Diwali Amavasya 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...