Dussehra Traditions : 'सोने घ्या, सोन्यासारखे रहा!' पण विजयादशमीला आपट्याची पाने देण्यामागचे कारण काय?

Anuradha Vipat

आपट्याची पाने

दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना आपट्याची पाने देऊन 'सोने घ्या, सोन्यासारखे रहा' म्हणण्याची परंपरा महाराष्ट्रात खूप जुनी आहे.

Dussehra Traditions | agrowon

ऐतिहासिक कथा

या दिवशी आपट्याची पाने देण्यामागे आणि 'सोने' लुटण्यामागे एक अतिशय रंजक पौराणिक आणि ऐतिहासिक कथा आहे.

Dussehra Traditions | Agrowon

गुरुदक्षिणा

पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळात वरतंतु ऋषींचे कौत्स नावाचे एक शिष्य होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर कौत्स यांनी ऋषींना गुरुदक्षिणा मागण्याची विनंती केली.

Dussehra Traditions | Agrowon

सोन्याच्या मुद्रा

गुरुंनी सुरुवातीला नकार दिला, पण कौत्स यांनी हट्ट धरल्यामुळे त्यांनी १४ कोटी सोन्याच्या मुद्रा (नाणी) गुरुदक्षिणा म्हणून मागितल्या.

Dussehra Traditions | agrowon

धन दान

कौत्स एवढी मोठी रक्कम मागण्यासाठी अयोध्येचा राजा रघु यांच्याकडे गेले. पण राजा रघुने नुकताच एक मोठा यज्ञ करून आपले सर्व धन दान केले होते.

Dussehra Traditions | agrowon

स्वारी

कौत्स यांना रिकाम्या हाती परत पाठवणे राजाला मान्य नव्हते, म्हणून त्यांनी संपत्तीचे दैवत असलेल्या कुबेर देवावर स्वारी करण्याचे ठरवले.

Dussehra Traditions | Agrowon

चमत्कार

राजा रघुचे शौर्य पाहून कुबेर देव घाबरले आणि त्यांनी अयोध्येतील शमी आणि आपट्याच्या झाडांवर सोन्याच्या मोहरांचा पाऊस पाडला. हा चमत्कार विजयादशमीच्याच दिवशी घडला होता.

Dussehra Traditions | Agrowon

Magic Of Acupressure : शरीराचे 'हे' भाग दाबा आणि औषधांशिवाय पळवून लावा गंभीर आजार!

Magic Of Acupressure | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...