Anuradha Vipat
विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी देशभरात मोठ्या उत्साहाने रावण दहन केले जाते.
या परंपरेमागे अत्यंत महत्त्वाचे पौराणिक आणि आध्यात्मिक संदेश दडलेले आहेत.
पौराणिक कथेनुसार, लंकेचा राजा रावण याने माता सीतेचे कपटाने हरण केले होते. त्यानंतर प्रभू श्रीराम आणि रावण यांच्यात तब्बल १० दिवस घनघोर युद्ध चालले.
अखेर विजयादशमीच्या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला आणि माता सीतेची सुटका केली. हा दिवस असत्यावर सत्याच्या आणि अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक मानला जातो.
याच विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी दरवर्षी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते.
रावण हा अत्यंत विद्वान, चारही वेदांचा ज्ञाता आणि महापराक्रमी शिवभक्त होता. परंतु, त्याच्याकडे असलेल्या प्रचंड ज्ञानाचा आणि शक्तीचा त्याला अहंकार झाला होता.
याच अहंकारामुळे आणि वाईट बुद्धीमुळे त्याचा सर्वनाश झाला.