Roshan Talape
दहीमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि प्रोटीन असतात जे हाडांना बळकट करण्यासाठी मदत करतात.
आंबट दहीच्या लॅक्टिक अॅसिडमुळे त्वचेवरील मृत पेशी दूर होतात आणि त्वचा गुळगुळीत आणि तेजस्वी बनते.
दहीमध्ये पोटॅशियम असतो, जो रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत करतो. त्यामुळे हायपरटेंशनच्या समस्यांवर नियंत्रण ठेवता येते.
आंबट दही शरीरातील चांगल्या जिवाणूंची वाढ करतात, जे रोगप्रतिकारक शक्तीला मजबूती देण्याचेही काम करतात.
दह्यातील जिवाणू मेंदूच्या कार्यावर सकारात्मक प्रभाव टाकतात, जे मानसिक चिंता-तणाव कमी करण्यास मदत करतात.
आंबट दहीमध्ये प्रोबायोटिक्स असतात, यामुळे आपल्या पचन क्रियेचा समतोल राखला जातो आणि बद्धकोष्ठता किंवा पचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो.
आंबट दहीमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असून फॅट्स-कार्ब्सची मात्रा कमी असते, ज्याने वजन नियंत्रणात राहणे आणि लठ्ठपणा कमी करणे सोपे होते.