Roshan Talape
तृणधान्यं म्हणजे ज्वारी, बाजरी, राळा, नाचणी, कोदो, वरई, साव्हा आणि अशा प्रकारची पारंपरिक अन्नधान्यं, जी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
शरीरात ताकद आणि प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी तृणधान्ये महत्त्वपूर्ण काम करतात, कारण यातील तंतुमय पदार्थ, प्रथिनं, लोह व झिंक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात.
मधुमेह असणाऱ्यांसाठी तृणधान्ये फायदेशीर ठरतात, कारण ती रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
तृणधान्य नियमित खाल्ल्यामुळे लवकर भूक लागत नाही, त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
तृणधान्याच्या सेवनाने शरीरातील कोलेस्टेरॉल लेवल कमी होते, त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
ग्लूटन इन्टॉलरन्स असलेल्यांसाठी तृणधान्यं एक उत्तम ग्लूटन फ्री पर्याय आहे, ज्यामुळे आरोग्याला कोणताही धोका नसतो.
तृणधान्य हे आरोग्यासाठी फायदेशीर असतात, त्यामुळे त्यांचा आहारात समावेश केल्यास तुमचं आरोग्य सुधारू शकतं.