Mahesh Gaikwad
कोणत्याही भाजीमध्ये सहज सामावली जाणारी भाजी म्हणजे बटाटा. त्यामुळे भारतीय अन्न परंपरेमध्ये बटाट्याचे अनन्य साधारण महत्त्व आहे.
शरीराच्या पोषणासाठी बटाटा खाणे फायदेशीर असते. पण, केवळ फक्त खाण्यासाठीच नाही, तर त्वचेसाठीही बटाट्याचे अनेक फायदे आहेत .
बटाट्याचा रस चेहऱ्याला लावल्यामुळे त्वचेसंबंधी अनेक फायदे होतात. चला तर मग पाहूयात याचीच माहिती.
बटाट्याचा रस चेहऱ्याला लावल्यामुळे त्वचेला नैसर्गिक ग्लो म्हणजे उजळपणा मिळतो.
नियमित बटाट्याचा रस चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्याची त्वचा कोमल आणि तजेलदार दिसते.
बटाट्याचा रस चेहऱ्याला लावल्यास तो नैसर्गिक ब्लीचिंगचे काम करतो. यामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाते आणि काळपटपणाही कमी होतो.
डोळ्यांच्या खालीली काळ्या वर्तुळांसाठी बटाट्याचा रस प्रभावी उपाय आहे. यामुळे डोळ्याच्या खालची काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते.
याशिवाय बटाट्याच्या रसामध्ये असणारे व्हिटामिन-सी चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठीही फायदेशीर आहेत.