Anuradha Vipat
नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास करण्याचे केवळ धार्मिकच नव्हे, तर आरोग्याच्या दृष्टीनेही अनेक आश्चर्यकारक वैज्ञानिक फायदे आहेत.
ऋतुबदलाच्या काळात शरीराला निरोगी ठेवण्यासाठी उपवास करणे हे उत्तम माध्यम मानले जाते.
नेहमीच्या जड अन्नाऐवजी फळे, दूध आणि राजगिरा यांसारखे पचायला हलके अन्न खाल्ल्यामुळे पचनक्रियेवरील ताण कमी होतो.
उपवासाच्या काळात कॅलरीचे प्रमाण नैसर्गिकरित्या कमी होते. योग्य आहार घेतला, तर शरीरातील अतिरिक्त चरबी वेगाने कमी होते आणि वजन नियंत्रणात राहते.
सात्विक आहारामुळे शरीरात आळस कमी होतो आणि ऊर्जेची पातळी वाढते.
उपवासामुळे शरीरातील जुन्या पेशी नष्ट होऊन नवीन आणि निरोगी पेशी तयार होण्याची प्रक्रिया वेगवान होते.
नऊ दिवस तेलकट आणि प्रक्रिया केलेले अन्न बंद राहिल्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि हृदय निरोगी राहते.