Anuradha Vipat
शिंगाड्याचे पीठ हे केवळ उपवासालाच खाल्ले जाणारे पीठ नसून, आरोग्यासाठी एक उत्तम सुपरफूड आहे.
यामध्ये पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन B6 आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पीठ नॅचरली ग्लुटेन-फ्री असते.
उपवासाच्या काळात जेव्हा शरीराला जास्त ऊर्जेची गरज असते, तेव्हा शिंगाड्याच्या पिठाचे पदार्थ खाल्ल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळते आणि थकवा दूर होतो.
शिंगाड्याच्या पिठामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. पोटॅशियम शरीरातील सोडियमचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.
शिंगाड्यामध्ये आयोडिन आणि मॅंगनीज सारखे महत्त्वाचे खनिजे आढळतात. हे घटक थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुरळीत ठेवण्यास आणि थायरॉईडच्या समस्येमध्ये आराम मिळवून देण्यास मदत करतात.
या पिठामध्ये फायबरचे प्रमाण जास्त आणि कॅलरीज कमी असतात. तसेच, हे पीठ खाल्ल्यानंतर पोट दीर्घकाळ भरलेले राहते, ज्यामुळे सारखी भूक लागत नाही.
उपवासाच्या दिवशी शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी हा एक उत्तम आहार आहे.