Anuradha Vipat
आंबा थेट पिंपल्स येण्याचे कारण नाही, पण आंबा खाण्याच्या पद्धती आणि प्रमाणावर ते अवलंबून असते .
आंब्यामध्ये नैसर्गिक साखर जास्त असते . एकाच वेळी जास्त आंबे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते. यामुळे शरीरात इन्सुलिन वाढते.
आंब्यामध्ये नैसर्गिकरित्या उष्णता वाढवणारे गुणधर्म असतात. आंबा जास्त खाल्ल्याने शरीराचे तापमान वाढून त्वचेवर पुरळ उठू शकते.
आंबा काढताना किंवा खाताना त्याचा चीक जर ओठांच्या आजूबाजूला किंवा चेहऱ्याला लागला, तर त्यामुळे त्वचेवर खाज सुटून बारीक पुरळ किंवा पिंपल्स येऊ शकतात.
आंबा खाण्यापूर्वी किमान १ ते २ तास पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे आंब्यातील अतिरिक्त उष्णता कमी होते आणि पिंपल्स येण्याचा धोका टळतो.
दिवसातून एक मध्यम आंबा किंवा एक वाटी आमरस खाणे पुरेसे आहे. अतिसेवन टाळा.
आंबा खाल्ल्यानंतर तोंड आणि हात स्वच्छ धुवा, जेणेकरून त्याचा गोडवा किंवा चीक चेहऱ्यावर राहणार नाही.