Team Agrowon
जीवनसत्व क चांगल्या प्रकारे उपलब्ध होते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती आणि त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. त्यात जीवनसत्त्व अ, क आणि विविध प्रकारची ब जीवनसत्त्वेदेखील असतात.
स्ट्रॉबेरी अँथोसायनिन्स आणि इलाजिक ॲसिडसारख्या अँटिऑक्सिडंट्सने परिपूर्ण आहेत. हे घटक पेशींचे संरक्षण करत असल्यामुळे जुनाट आजारांचा धोका कमी करतात.
स्ट्रॉबेरीमध्ये उच्च अँथोसायनिन घटक असल्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी आणि रक्तदाब कमी करतात. त्याचा फायदा हृदयाच्या आरोग्यासाठी होतो.
तंतूमय पदार्थांचा चांगला स्रोत असून, पचनास मदत करतात. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राखण्यास मदत होते.
स्ट्रॉबेरीमधील अँटिऑक्सिडंट्समध्ये दाह विरोधी गुणधर्म असतात. जळजळ, दाह यांचा धोका कमी होतो.
स्ट्रॉबेरीमधील अँटिऑक्सिडंट्समध्ये दाह विरोधी गुणधर्म असतात. जळजळ, दाह यांचा धोका कमी होतो.
स्ट्रॉबेरीमधील जीवनसत्व क हे निरोगी त्वचेसाठी आवश्यक अशा कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन देते.