Anuradha Vipat
सकारात्मक विचारसरणी म्हणजे केवळ संकटांकडे दुर्लक्ष करणे नव्हे, तर आयुष्यातील चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून आव्हानांचा सामना करणे होय.
सकारात्मक विचारांचा आपल्या मानसिक आरोग्यासोबतच शारीरिक आरोग्यावरही अत्यंत खोल आणि सकारात्मक परिणाम होतो.
सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांमध्ये 'कॉर्टिसोल' या स्ट्रेस हार्मोनची पातळी नियंत्रित राहते.
नकारात्मक विचारांचे चक्र थांबल्यामुळे डिप्रेशन आणि अँक्झायटी चा धोका खूप कमी होतो.
जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करता, तेव्हा स्वतःवर आणि स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास अधिक दृढ होतो.
सकारात्मक राहणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमालीचा कमी असतो. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.
पॉझिटिव्ह राहिल्याने शरीरातील रोगप्रतिकारक पेशी अधिक सक्रिय होतात. त्यामुळे शरीर कोणत्याही संसर्गाशी किंवा आजाराशी सहज लढा देऊ शकते.