Anuradha Vipat
स्वयंपाकघरातील काही जुन्या आणि आरोग्यास हानिकारक वस्तू बदलून त्या जागी निरोगी पर्याय आणले, तर अनेक आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो.
स्वयंपाकासाठी कच्च्या घाण्याचे शेंगदाणा तेल, मोहरीचे तेल किंवा शुद्ध खोबरेल तेल वापरा.
लोखंडी भांड्यात जेवण बनवल्याने अन्नामध्ये नैसर्गिकरित्या लोहाचे प्रमाण वाढते, ज्यामुळे रक्ताची कमतरता होत नाही. मातीच्या भांड्यांमुळे अन्नाचा सात्त्विक दर्जा टिकून राहतो.
गुळामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखी खनिजे असतात, जी पचनक्रिया सुधारतात आणि साखरेप्रमाणे रक्तातील ग्लुकोजची पातळी अचानक वाढवत नाहीत.
घरात संपूर्ण गव्हाचे पीठ वापरा किंवा त्यात नाचणी (ज्वारी, बाजरी), ओट्स आणि चण्याचे पीठ मिसळून मल्टीग्रेन पीठ तयार करा.
स्वयंपाकघरात अन्न किंवा मसाले साठवण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिकचे डबे आणि बाटल्या फेकून द्या. प्लास्टिकमधील 'बीपीए' हे केमिकल अन्नात मिसळून हॉर्मोन्सचे संतुलन बिघडवते.
बाजारातील रेडीमेड मसाल्यांऐवजी घरी तयार केलेले ताजे खडे मसाले वापरा. तसेच पिण्यासाठी प्लास्टिकच्या वॉटर प्युरिफायर ऐवजी तांब्याच्या भांड्यातील किंवा मातीच्या माठातील पाणी पिण्यास सुरुवात करा.