Team Agrowon
आयुर्वेदात नारळपाण्याला खूप महत्त्व आहे. नारळात जीवनसत्त्वे ब आणि क मुबलक प्रमाणात असते. याच बरोबरीने पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, लोह, फॉस्फरसदेखील उपलब्ध असतात.
नारळपाण्यात स्निग्धपदार्थ कमी प्रमाणात असतात. यातील पोषक घटकामुळे भुकेवर नियंत्रण राहते. तुमचे जेवण नियंत्रित राहते.
जुलाब आणि शरीराची आग होत असेल किंवा त्वचा कोरडी होत असेल तर नारळपाणी प्यावे.
नारळपाण्यात असलेल्या जीवनसत्त्व-क, पोटॅशियम आणि मॅग्नेशियममुळे रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते.
डोकेदुखी असणाऱ्यांमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण कमी होते. नारळपाण्याने ती कमतरता भरून काढली जाते. परिणामी डोकेदुखीवर आराम मिळतो.
शरीरात पाण्याची कमतरता, पोटाचे आजार, स्ट्रोक, हायपरटेंशन, किडनी स्टोन इत्यादी आजारांवर नारळाचे पाणी फायदेशीर ठरते.
नारळाचे पाणी कर्बोदकाचा उत्तम स्रोत आहे. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.