sandeep Shirguppe
नियमितपणे शेवग्याच्या पानांच्या पावडरचे सेवन केल्यास प्रथिनांची गरज पूर्ण होण्यास मदत होते.
शेवग्याची पाने वाळवून पावडर बनवतात या पानांत प्रथिने तसेच अनेक आवश्यक पोषक घटक असतात.
शेवग्याच्या पानांमध्ये कॅल्शियम, लोह, प्रथिने, मॅग्नेशियम, तांबे, जीवनसत्त्वे B1, B2, B3, C आणि E हे घटक असतात.
प्रथिने समृद्ध असल्याने ते स्नायू तयार करण्यास आणि मजबूत करण्यास मदत करते.
तुम्हाला व्हायरल इन्फेक्शनचा सतत त्रास होत असेल तर शेवग्याच्या पानांची पावडर प्रतिकारशक्ती वाढवेल.
सकाळी रिकाम्या पोटी शेवग्याच्या पानांची पावडर सेवन केल्यास शरीरातील चरबी लवकर कमी करण्यास मदत होईल.
शेवग्याच्या पानांच्या पावडरमध्ये प्रथिने आणि कॅल्शियम असल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते.
ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी शेवग्याच्या पानांची पावडर खूप फायदेशीर ठरू शकते.