Roshan Talape
थंड, स्वच्छ आणि निळसर प्रवाह असलेली लिद्दर नदी ही अॅडव्हेंचर प्रेमींसाठी स्वर्ग आहे. येथे रिव्हर रायफ्टिंग, ट्राउट फिशिंगसारखा अनुभव मिळतो.
प्राचीन स्थापत्यकलेचा अद्भुत नमुना असलेले हे मंदिर ९व्या शतकातील आहे. या प्राचीन मंदिराचे अवशेष इतिहासप्रेमी आणि पुरातत्त्व अभ्यासकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे.
तुलियन लेक ट्रेक हा बर्फाच्छादित पर्वतांतून जाणारा सुंदर आणि रोमांचकारी ट्रेक आहे.
चंदनवाडी हे अमरनाथ यात्रेचं सुरुवातीचं ठिकाण असून येथे उन्हाळ्यातही बर्फाचा अनुभव घेता येतो.
'मिनी स्वित्झर्लंड' म्हणून ओळखले जाणारे बायसरण हे ठिकाण घोडेस्वारीसाठी प्रसिद्ध असून येथे दिसणारे निसर्गदृश्य अत्यंत मनमोहक आहेत.
पेहलगामपासून अवघ्या १२ किमी अंतरावर वसलेली आरू व्हॅली ही बर्फाच्छादित पर्वत, हिरवीगार कुरणं आणि ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध जागा आहे.
स्थानिक हस्तकला, ऊनी वस्त्रं आणि पारंपरिक काश्मीरी खाद्यपदार्थ अनुभवण्यासाठी पेहलगाम मार्केट अनोखी जागा आहे.
चित्रपट ‘बेटाब’मुळे प्रसिद्ध झालेली बेटाब व्हॅली ही हिरवाई, डोंगररांगा आणि खळाळत्या नदीच्या प्रवाहाने सजलेली आहे.