Roshan Talape
जेवल्यानंतर १०-१५ मिनिटं संथ चालल्याने अन्न पचायला मदत होते, पचनक्रिया सुरळीत राहते आणि गॅस तसेच अपचन टाळता येते.
जेवल्यानंतर कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यायल्याने अॅसिडिटी कमी होते, शरीर डिटॉक्स होतं आणि पचनक्रियाही सुधारते.
आल्याचा किंवा पुदिन्याचा गरम चहा पिल्यास अपचन, गॅस आणि मळमळ यावर आराम मिळतो आणि पचन सुधारते.
जेवल्यानंतर थोडं अननस किंवा पपई खाल्ल्यास यातील असणाऱ्या एन्झाईम्समुळे पचन सुधारतं.
कापलेल्या आल्यावर काळं मीठ टाकून खाल्ल्यास पाचक रस स्राव वाढतो आणि अपचन, मळमळ यावर आराम मिळतो.
जेवल्यानंतर फक्त ५-१० मिनिटं वज्रासनात बसल्यास पचनक्रिया सक्रिय होते आणि अॅसिडिटी, गॅसची तक्रार कमी होते.
जेवल्यानंतर बडीशेप चघळल्यास अन्नपचन सुधारते, गॅस कमी होतो आणि तोंडाला नैसर्गिक सुगंधही येतो.