Roshan Talape
अशियाई प्रदेशांमध्ये मान्सूनचा अर्थ पावसाळा या अर्थी वापरतात. मान्सून वारे हे ऑगस्ट ते सप्टेंबरच्या कालावधीमध्ये नैऋत्येकडून आणि इतरवेळी इशान्येकडून वाहतात.
देशात यंदा माॅन्सूनचा मुक्काम लांबण्याची शक्यता आहे. त्यातच सप्टेंबरपासून ला निनाची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
माॅन्सूनचा परतीचा प्रवास तर लांबलेच शिवाय निनामुळे जोरदार पावसाचाही अंदाज आहे.
सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात कमी दाब प्रणाली निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. या प्रणालीमुळे माॅन्सूनचा परतीचा प्रवास उशीरा होऊ शकतो.
माॅन्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात ला निना स्थिती तयार झाली आहे. माॅन्सूनचा परतीचा प्रवास उशीरा झाला आहे. यंदाही असेच घडू शकते.
माॅन्सूनचा प्रवास जून महिन्यात सुरु होतो आणि सप्टेंबरच्या मध्यानंतर माॅन्सून परतीच्या प्रवासावर निघत असतो. तर ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत माॅन्सून देशातून परतलेला असतो.
ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत माॅन्सून देशातून परतलेला असतो. आता माॅन्सूनचा प्रवास लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
माॅन्सूनचा प्रवास लांबल्यामुळे ऐन पीक काढणीच्या काळात पिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने शेतकऱ्यांची चिंताही वाढली आहे.