Agriculture Mini Sprinkler : मिनी स्प्रिंकलर्सचे कृषी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण फायदे

Roshan Talape

मिनी स्प्रिंकलर्सचे फायदे

मिनी स्प्रिंकलर्स ही शेतीत वापरली जाणारी कार्यक्षम अशी छोटी सिंचन प्रणाली आहे. ही सिंचन प्रणाली शेती पिकांना पावसाप्रमाणे पाणी देण्यासाठी मदत करते.

Agriculture Sprinklers | Agrowon

शेतातील उत्पादकता वाढण्यास मदत

मिनी स्प्रिंकलर्स आधुनिक कृषी सिंचन पद्धतीपैकी एक आहे. ही पद्धत पाणी संवर्धनासोबत शेतातील पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते.

Agriculture Sprinklers | Agrowon

संपुर्ण शेतासाठी फायदेशीर

या सिंचन प्रणालीमुळे पिकांना एकसमान पाणी देता येते, तसेच पिकांवर जास्त पाण्याचा ताण येत नाही आणि पिकांना योग्य प्रमाणात पाणी मिळते.

Agriculture Sprinklers | Agrowon

संपुर्ण शेताला पाणी देण्यासाठी उपयुक्त

मिनी स्प्रिंकलर्स या सिंचन प्रणालीच्या माध्यमातून एका ठिकाणावरुन शेतातील पुर्ण पिकावर पाणी पोहचविण्यासाठी उपयोगी ठरते.

Agriculture Sprinklers | Agrowon

मातीची धूप होण्यापासून बचाव

मिनी स्प्रिंकलर्समुळे पाण्याचा वापर कमी प्रमाणात होऊन मातीची धूप कमी होते.

Agriculture Sprinklers | Agrowon

पाण्याचे संवर्धन

पारंपारिक सिंचन प्रणालींच्या तुलनेत ही प्रणाली कमी पाणी वापरते. कारण यातून थेट जमिनीत आणि पिकांवर पाणी पोहोचते. ज्यामुळे बाष्पीभवन आणि पाण्याची गळती कमी होण्यास मदत होते.

Agriculture Sprinklers | Agrowon

मिनी स्प्रिंकलर्सचा उपयोग

एका रांगेतील पिकांसाठी म्हणजेच भाजीपाला आणि फळ या पिकांसाठी अचूक पाणी पुरवठा देता येतो. तसेच उद्याने आणि सजावटीच्या वनस्पतींसाठी जिथे सौम्य तसेच कमी पाण्याची आवश्यकता लागते तिथे या प्रणालीचा उपयोग होतो.

Agriculture Sprinkler | Agrowon
अधिक माहितीसाठी