Mahesh Gaikwad
भारतातील बहुतांशी घरातील सकाळ चहाच्या कपानेच होते. चहा हा भारतीयांच्या खाद्य संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे.
भारतात मोठ्या प्रमाणात चहा पिण्याचे शौकीन आहेत. एकदा का चहाची सवय लागली की ती सुटणे तसे कठीण असते.
पण जर तुम्ही एक महिना जर चहा प्यायला नाही, तर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये अनेक बदल झालेले दिसतात.
चहामुळे दातांचा पिवळेपणा वाढतो, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वस कमी होतो. महिनाभर चहा न घेतल्यास हळूहळू दातांचा नैसर्गिक रंग परत येतो.
चहामध्ये कॅफेन असते, ज्यामुळे झोपेचे चक्र बिघडते. एक महिना चहा सोडल्यास गाढ झोप येते आणि सकाळी ताजेतवाने वाटते.
चहातील कॅफिन आणि टॅनिन्समुळे काही लोकांना आम्लपित्ताचा त्रास होतो. चहा बंद केल्यामुळे गॅस, अॅसिडिटी, अपचन कमी होऊन पचनक्रिया सुधारते.
एक महिनाभर चहा बंद केल्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो आणि केसही चमकदार होतात.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक महिन्याचा चहावर होणारा मोठा खर्च कमी होतो.तो खर्च वाचवून इतर आरोग्यदायी गोष्टींसाठी तुम्ही वापरू शकता.