Mahesh Gaikwad
कबूतर आणि पारवा हा एक सारखाच दिसणारा पक्षी आहे. या दोन्ही पक्षांमध्ये केवळ रंगाचा फरक असतो.कबूतर रंगीबेरंगी तर पारवा राखाडी रंगाचा असतो.
मोठ्या शहरांत इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणात कबूतरे आढळून येतात. हीच कबूतरे मानवी आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.
कबूतरांची विष्ठा आणि पिसे यामुळे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. चला जाणून घेऊया कोणते आजार होऊ शकतात.
कबूतरांची विष्ठा आणि पिसांमधील धूळ श्वसनमार्गात गेल्याने श्वास घेण्यास त्रास, खोकला, ताप, थकवा असे आजार होतात.
कबूतरांच्या विष्ठेत आढळणाऱ्या बुरशीमुळे होणारा हा आजार फुफ्फुसांना व मेंदूला बाधित करू शकतो. डोकेदुखी, ताप, श्वसनास त्रास ही याची मुख्य लक्षणे आहेत.
गच्चीत येणाऱ्या याच कबूतरांमुळे फुफ्फुसाच्या संसर्गाचा गंभीर आजार होण्याचा धोका असतो.
कबूतरांच्या विष्ठेमध्ये क्लेमीजिया सीटीकी नावाचा मानवी आरोग्यासाठी धोकादायक जीवाणू आढळतो.
हा जीवाणू हवेत मिसळून श्वासावाटे माणसांच्या फुफ्फुसात प्रवेश करतो. यामुळे फुफ्फुसाचा संसर्ग होतो.