Roshan Talape
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक ही ऐतिहासिक दृष्टीने महत्वाची घटना मानली जाते. ६ जून १६७४ रोजी महाराजांचा राज्याभिषेक पार पडला.
राज्याभिषेकाचा सोहळा जिजाबाईंच्या आशीर्वादाने आणि धार्मिक विधींच्या सोबत पार पडला.
शिवाजी महाराजांनी या दिवशी छत्रपती हे पद ग्रहण केले आणि राज्याच्या कारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली.
गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेले पाण्याच्या जलकुंभांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक केला.
महाराजांनी लालरंगाचे वस्त्र परिधान केले. अलंकार परिधान केले. गळ्यात फुलांचे हार घातले. एक राज मुकुट घालून सोन्याने मढवलेल्या सिंहासनावर महाराज बसले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी महाराणी म्हणून सोयराबाई आणि युवराज म्हणून छत्रपती संभाजीराजे महाराजांचा ही अभिषेक करण्यात आला.
राज्याभिषेकासाठी देशभरातून ब्राह्मण आणि जनतेने मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती. तेव्हा गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली.
राज्याभिषेक हा मराठा साम्राज्याच्या स्थापनेचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचा क्षण ठरला.