Anuradha Vipat
रोज कच्चा कांदा खाण्याचे शरीराला अनेक जबरदस्त फायदे होतात, पण अतिप्रमाणात खाल्ल्यास काही नुकसान किंवा दुष्परिणामही होऊ शकतात.
कांद्यामध्ये क्रोमियम आणि सल्फर असते, जे रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराला आजारांपासून वाचवतात.
कच्च्या कांद्यामध्ये फायबर आणि प्रीबायोटिक्स असतात, जे पोटातील चांगल्या बॅक्टेरियांना वाढवतात आणि बद्धकोष्ठता दूर करतात.
कच्च्या कांद्यामध्ये असलेल्या सल्फरमुळे तोंडातून उग्र वास येतो.
ज्यांना गॅस किंवा ॲसिडिटीचा त्रास आहे, त्यांनी जास्त कच्चा कांदा खाल्ल्यास छातीत जळजळ वाढू शकते.
मधुमेहाचे रुग्ण जे औषधे घेत आहेत, त्यांनी अतिप्रमाणात कांदा खाल्ल्यास साखर अचानक कमी होऊ शकते.