Anuradha Vipat
कमी वयात केस पांढरे होण्यामागे शरीरातील व्हिटॅमिन बी१२ आणि व्हिटॅमिन डी ची कमतरता हे सर्वात मुख्य कारण मानले जाते.
व्हिटॅमिन बी१२ मुळे शरीरात लाल रक्तपेशी तयार होतात, ज्या केसांच्या मुळांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करतात.
दूध, दही, पनीर, अंडी आणि फोर्टिफाइड तृणधान्ये. विशेषतः शाकाहारी लोकांमध्ये याची कमतरता जास्त आढळते.
शरीरात व्हिटॅमिन डी खूप कमी असेल, तर अकाली केस पांढरे होण्याची समस्या उद्भवू शकते.
दररोज सकाळी १० ते १५ मिनिटे कोवळ्या सूर्यप्रकाशात बसा. आहारातून मिळवण्यासाठी अंडी आणि मशरूमचा समावेश करा.
शरीरात रक्ताची किंवा आयर्न आणि बायोटिनची कमतरता असेल, तरीही केस गळणे आणि पांढरे होणे सुरू होते.
जास्त ताण घेतल्याने शरीरातील मेलेनिन पेशींवर विपरीत परिणाम होतो.