sandeep Shirguppe
खाऊचे विड्याचे पानाला भारतीय संस्कृतीत महत्व आहे. पोटाच्याबाबतीत पानाचे आरोग्यदायी फायदे आहेत.
विड्याच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने मधुमेह नियंत्रित, बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत होते.
हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी, दाहक-विरोधी, व्रण-विरोधी आणि संसर्ग-विरोधी गुणधर्म असतात.
विड्याचे पान पोटासंबंधित समस्यांपासून आराम मिळवून देण्यास मदत होते.
बद्धकोष्ठतेच्या समस्येवर विड्याचे पान जालीम औषध म्हणून पाहिले जाते.
खोकला, ब्राँकायटिस, दमा यांसारख्या श्वसनविषयक आजारांवर विड्याचे पान उपयुक्त आहे.
पानांमध्ये आढळणारी संयुगे रक्तसंचय दूर करण्यास आणि श्वासोच्छवास सुधारण्यास मदत करतात.
विड्याच्या पानांत अँटी-हायपरग्लायसेमिक गुणधर्म असतात जे साखर नियंत्रित ठेवण्याचे काम करतात.