Mahesh Gaikwad
दूध पिणे निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे आहार तज्ज्ञ सांगतात. दूधामध्ये असणाऱ्या पोषक घटकांमुळे याला संपूर्ण आहार असेही म्हटले जाते.
दुधामध्ये कॅल्शिअम, प्रोटीन, व्हिटामिन-ए, व्हिटामिन-के, व्हिटामिन-डी आणि व्हिटामिन-आय ही जीवनसत्त्वे आढळतात.
हाडांच्या मजबूतीसाठी डॉक्टरही आपल्याला दूध पिण्याचा सल्ला देतात. हाडांच्या मजबूतीशिवाय स्नायूसुध्दा बळकट होतात.
पण बरेच लोक उपाशीपोटी दूध पितात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, उपाशीपोटी दूध प्यायल्याने पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
उपाशीपोटी दूध प्यायल्याने बध्दकोष्ठता आणि गॅसची समस्या होवू शकते. तसेच ज्यांना पचनाची समस्या आहे, अशांनी रिकाम्यापोटी दूध पिणे शक्यतो टाळले पाहिजे.
लहान मुलांना मात्र, उपाशीपोटी दूध प्यायला देण्यास हरकत नसते. लहान मुले कधीही दूध पिऊ शकतात. कारण त्यातून त्यांना उर्जा मिळते.
लहान मुले जरी सकाळी उपाशीपोटी दूध पिऊ शकत असली, तरी प्रौढांनी उपाशीपोटी दूध प्यायल्यास त्यांना पोटाचा त्रास होवू शकतो. ही बातमी सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी आहार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.