Mahesh Gaikwad
दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्यामुळे उष्माघाताचा धोकाही वाढला आहे. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे उष्माघाताचा त्रास होऊ शकतो.
उन्हाळ्यात उष्माघाताचा धोका टाळाण्यासाठी भरपूर पाणी प्या. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहते.
शरिराचे तापमान थंड ठेवण्यासाठी कोल्ड्रिंकऐवजी नारळपाणी, ताक, सरबत किंवा ताज्या फळांचा रस पिण्याला प्राधान्य द्या.
या दिवसांत मद्यपानासह चहा आणि कॉफीचे सेवन कमी करण्याचा प्रयत्न करा. हलका आणि पोषक आहार घ्या. तसेच कलिंगड, काकडी यासारखी पाणीदार फळे खा.
या दिवसांमध्ये दुपारच्या रणरणत्या उन्हात बाहेर पडणे शक्यतो टाळा. बाहेर पडताना सैल कपडे, टोपी, गॉगल किंवा छत्रीचा वापरा, जेणेकरून उन्हापासून बचाव होईल.
महत्त्वाची कामे असली, तरी त्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी घराबाहेर पडा. दुपारच्या प्रखर उन्हात बाहेर पडणे टाळा.
या दिवसामध्ये जर डोकेदुखी, चक्कर येणे, जास्त घाम येणे, मळमळ किंवा उलटी या सारखी लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांना भेटा.