Castor Oil For Hair : एरंडीच्या तेलाने कोंड्यापासून केसगळीतीची समस्या होईल दूर

Mahesh Gaikwad

एरंडीचे तेल

एरंडीचे तेल म्हणजेच कॅस्टर ऑईल केसांसाठी वरदान आहे. याच्या नियमित वापराने केस मजबूत, लांब आणि चमकदार होतात.

Castor Oil For Hair | Agrowon

केसांची वाढ

एरंडीच्या तेलामध्ये ओमेगा-६ फॅटी अॅसिड आणि रिकिनोलेइक अॅसिड असते, जे रक्ताभिसरण सुधारून केसांची वाढ जलद करण्यास मदत करते.

Castor Oil For Hair | Agrowon

केसगळती रोखते

एरंडीच्या तेलातील अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्मांमुळे टाळू स्वच्छ राहते आणि केसगळती कमी होण्यास मदत होते.

Castor Oil For Hair | Agrowon

कोंड्याची समस्या

एरंडीच्या तेलामुळे कोरड्या टाळू मॉइश्चरायझ होते. परिणामी कोंड्याचा त्रास कमी होतो आणि टाळू निरोगी राहते.

Castor Oil For Hair | Agrowon

केसांची मजबूती

केसांच्या फाट्यांची समस्या असेल तर एरंडीचे तेल लावल्यामुळे केस मऊ आणि मजबूत होतात आणि लांबही होतात.

Castor Oil For Hair | Agrowon

नैसर्गिक चमक

एरंडीच्या तेलातील मॉइश्चरायझिंग गुणधर्मांमुळे केस अधिक मऊ आणि मुलायम होतात, ज्यामुळे त्यांना नैसर्गिक चमक मिळते.

Castor Oil For Hair | Agrowon

केसांच्या मुळांना पोषण

एंरडीचे तेल केसांच्या मुळांना पोषण देते, ज्यामुळे केस दाट आणि निरोगी राहतात.

Castor Oil For Hair | Agrowon

असे वापरा

कोमट केलेले एरंडीच्या तेलाने हलक्या हाताने मसाज करा, २-३ तास ठेवा आणि सौम्य शॅम्पूने धुवा. आठवड्यातून २ वेळा वापरल्यास उत्तम परिणाम मिळतील. ही माहिती सामान्य माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Castor Oil For Hair | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....