Roshan Talape
अॅग्रिस्टॅक योजना म्हणजे भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ज्याद्वारे देशातील शेती क्षेत्र डिजिटल तंत्रज्ञानाशी जोडण्याचे उद्दिष्ट हे आहे.
शेतकऱ्यांसाठी आवश्यक डेटा, सेवा आणि योजनांचा एकत्रित डिजिटल मंच तयार करणारी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे.Objective of AgriStack scheme
शेतीची उत्पादकता वाढवणे, शेतकऱ्यांना योग्य सल्ला आणि माहिती उपलब्ध करणे, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत पारदर्शकता आणणे, हे अॅग्रिस्टॅक योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
शेतकऱ्यांसाठी डिजिटल डेटाबेस, ड्रोन आणि AI तंत्रज्ञानाचा शेतीत वापर, तसेच पीकविमा, सबसिडी, कर्ज यांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
हवामान बदलाचा अचूक अंदाज, योग्य बाजारपेठेत चांगल्या किंमतीची माहिती, आणि सरकारी योजनांचा सहज लाभ मिळवून देणारी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर अशी ही योजना आहे.
काही निवडक राज्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी करण्यात येत आहे, तसेच खासगी कंपन्या, संशोधन संस्था आणि कृषी विद्यापीठांशी भागीदारी करून या योजनेची कार्यक्षमता वाढवली जात आहे.
अॅग्रिस्टॅक योजना शेतकऱ्यांना डिजिटल युगाशी जोडणारी योजना आहे. आधुनिक शेतीसाठी नवी दिशा आणि आर्थिक स्थैर्याचा आधार देणारी योजना आहे.
अधिक माहितीसाठी आपले कृषी अधिकारी किंवा www.agristech.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
Dangers of Ginger Tea : थंडीमध्ये आल्याचा चहा आरोग्यदायी, पण जास्त प्रमाणात प्यायल्यास होऊ शकतात हे धोके!