Roshan Talape
आल्याच्या चहामध्ये असलेल्या उष्ण घटकांमुळे काही लोकांच्या त्वचेवर पुरळ आणि खाज येऊ शकते.
आल्यामुळे शरीरातील उष्णता वाढते, त्यामुळे गरम हवामानात आल्याचा चहा प्यायल्याने अस्वस्थ वाटू शकते.
आले रक्त पातळ करते, त्यामुळे रक्तदाब कमी करणारी औषधे घेत असताना आल्याचा चहा कमी प्यावा.
जास्त चहा घेतल्यास पोटदुखी, गॅस आणि आम्लपित्त होऊ शकते.
आल्याचा चहा जास्त प्रमाणात घेतल्यास पित्त वाढते आणि छातीत जळजळ होऊ शकते.
गरोदर महिलांनी जास्त चहा टाळावा, कारण त्याचा गर्भधारणेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
आले रक्तदाब कमी करते. त्यामुळे कमी रक्तदाब असलेल्या लोकांनी ते जपून घ्यावे.
टीप: आल्याचा चहा प्रमाणात प्यायल्यास सुरक्षित आहे. त्रास जाणवला तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.