sandeep Shirguppe
आयुर्वेदात सर्वात प्रभावी आणि उपयोगी निलगिरीचे तेल म्हणून ओळखले जाते. याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
बदलती जीवनशैली आणि वर्क कल्चरनुसार दुखण्याच्या समस्या वाढल्यात यावर रामबाण उपाय निलगिरीचे तेल आहे.
निलगिरीच्या तेलात अँटी-इफ्लांमेटर गुण असतात. त्यामुळे सूजलेल्या भागावर लावल्यास सूजन लगेच कमी होण्यास मदत होते.
दात आणि हिरड्यांच्या समस्यांसाठी निलगिरीचे तेल वापरले जाते. यातील अँटी-ऑक्सिडंट्सच्या गुणामुळे जिवाणूचे संक्रमण होत नाही.
तुम्हीही सर्दी-तापापासून त्रस्त असाल तर या तेलाचा वापर करा. यामध्ये असलेल्या अँटी-इंफ्लामेटरी गुणांमुळे सर्दी-तापाची समस्या दूर होईल.
पिंपल्समुळे तयार झालेली जखम निलगिरीच्या तेलामुळे लवकर भरण्यास मदत होते.
थंडीत बऱ्याच वेळा खाज, बॅक्टेरिया, फंगस यासारखे आजार होता यासाठी निलगीरी तेल लावल्यास तुमचा संसर्ग थांबविता येतो.
जर नीलगिरीचे तेल छातीवर लावले, तर ते जडपणाची समस्या दूर करते. यामुळे शरीराला ऑक्सिजन अधिक चांगल्या प्रकारे मिळू शकेल.
ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही.