Aslam Abdul Shanedivan
उन्हाळ्याच्या दिवसाच प्रचंड गर्मी आणि उन्हाच्या झळांमुळे जंगलात वणवा लागण्याच्या घटना वाढत आहेत
यावरून अग्निशमन आणि वन विभागाने शेतकऱ्यांसह सर्वसामांन्याना काळजी घेण्याचे आवाहन करताना माहिती दिली आहे
कधी कधी विडी, सिगारेट तर अनेकदा शिकारीसाठी जंगलात आग लावली जाते. यातूनच वणवा पेटतो.
यामुळे वनौषधी, सरपटणारे प्राणी, कीटक, तृणभक्षी प्राण्यांचे नुकसान होते.
शासकीय व खासगी जंगलात सहा व बारा मीटरच्या जाळरेषा काढव्यात
जंगलात आग निरीक्षणासाठी मनोरा उभारणीसह रस्त्याच्या दुतर्फा जाळरेषा असावी
वनात स्वयंपाक करू नये, तसे करण्यापासून दुसऱ्यास परावृत्त करावे. वनालगतच्या शेतातील पालापाचोळा आणि उसाच्या फडाचे पाचट जाळू नये