Raireshwar Fort : अवघड घाट डोंगर वाट चढत शेतकऱ्यांने ट्रॅक्टर पोहचवला रायरेश्वरवर

Swapnil Shinde

पठारावर शेती

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामधील रायरेश्वर किल्ला परिसरात विस्तीर्ण पठार आहे. या पठारावर काही जण शेती करतात. 

Raireshwar Fort

भाताची शेती

पठारावर पारंपारिक पध्दतीने भातसोबत नाचणी, वरई आणि गव्हाची शेती केली जाते.

Raireshwar Fort

रस्ता नाही

४ हजार ६९४ फूट उंचीवर असलेल्या या पठारावर रस्ता नसल्याने वाहने घेऊन जाता येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना अवघड वाट चढत जावे लागते

Raireshwar Fort

ट्रॅक्टर खरेदी

रायरेश्वर येथील अशोक रामचंद्र जंगम आणि रविंद्र रामचंद्र जंगम या दोघा भावांनी शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर खरेदी केला.

Raireshwar Fort

पार्ट वेगळे केले

त्यांनी शक्कल रढवत ट्रॅक्टरचे टायर, इंजिन, मडगार्ड तसेच काही अवजड पार्ट वेगळे केले.

Raireshwar Fort

खांद्यावर ट्रॅक्टरचे पार्ट

मग कड्याकपऱ्यातून वाट काढत 20 ते 25 ग्रामस्थांनी सर्व पार्ट किल्ल्यावर पोहोचवले.

Raireshwar Fort

ट्रॅक्टरने मशागत

पठारावर पोहोचल्यानंतर सर्व पार्ट जोडण्यात आले. त्यानंतर ट्रॅक्टर सुरु झाला.

Raireshwar Fort
आणखी पहा...