Soil Tillage : पेरणीपूर्वी जमिनीची मशागत करण्याचे फायदे

Team Agrowon

जमीन ढिली आणि मोकळी करणे

मोकळ्या जमिनीमध्ये पावसाचे आणि ओलिताचे पाणी सहज मुरते.

Soil Ploughing | Agrowon

जमिनीत हवा खेळती ठेवणे

मशागतीमुळे हवा खेळती राहिल्यामुळे वनस्पतीची मुळे आणि सूक्ष्मजीवांची चयापचय क्रिया योग्य रितीने होण्यास मदत होते. मातीमध्ये असलेल्या सेंद्रिय पदार्थांचे विघटन जलद गतीने होण्यास मदत होते.

Soil Ploughing | Agrowon

जमिनीचे तापमान वाढविणे

जमिनीत हवा आणि पाणी यांच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवता येते. जमिनीचा जास्तीत जास्त भाग सूर्याच्या उन्हाखाली आणल्यामुळे तापमान वाढून जमिनीतील सूक्ष्मजीवांच्या कार्यालाही वेग मिळतो. या प्रक्रिया जलद झाल्याने पिकाला फायदा मिळतो.

Soil Ploughing | Agrowon

धसकटे काढणे

मशागतीमुळे पूर्वीच्या पिकाचे धसकटे काढली जाऊन नव्या पिकांच्या मुळांच्या वाढीला जागा उपलब्ध होते. जमीन पेरणी व पुढील सिंचनासाठी तयार करणे सोपे जाते.

Soil Ploughing | Agrowon

तणांचे नियंत्रण करणे

पिकांपेक्षा वेगाने वाढून तणे पिकांशी अन्न, पाणी व अन्य घटकांसाठी स्पर्धा करतात. त्याचा विपरीत पिकाच्या उत्पादनावर पडतो. बहुवार्षिक तणांच्या गाठी व मुळ्या काढण्यासाठी तीन वर्षांतून एकदा खोलवर नांगरणी आणि वेचणीची शिफारस केली जाते.

Soil Ploughing | Agrowon

कीटकांचा नाश करणे

किडींचे प्रादुर्भाव व समस्या जरी पिकावर दिसत असल्या तरी किडीच्या जीवनप्रक्रियेतील काही अवस्था मातीमध्ये पार पडत असतात.

Soil Ploughing | Agrowon

सेंद्रिय/भरखते जमिनीत मिसळणे

सेंद्रिय खते जमिनीवर पसरवल्यास त्यातील सेंद्रिय कर्बासह अन्नद्रव्यांचा ऱ्हास वेगाने होते. त्यामुळे अशी खत मशागतीनंतर मातीमध्ये चांगल्या प्रकारे मिसळून थोड्या खोलीवर दिल्यास पिकांना अधिक फायदा होतो.

Soil Ploughing | Agrowon

Buffalo Sellection : अशी करा दुधाळ म्हशीची निवड

Buffalo Sellection | Agrowon
आणखी पाहा