Team Agrowon
शक्यतो नुकतीच विलेली म्हैस वासरासह विकत घ्यावी व सकाळी व संध्याकाळी स्वतः दूध उत्पादन पाहून खात्री करून घ्यावी. हिस्सार, जिंद, रोहतक इत्यादी ठिकाणी एजंट अशा म्हशी दाखवून खरेदी करून देतात.
म्हशीचे दूध राखून कास मोठी दाखवून बाजारात विक्री करतात. त्याबद्दल जागरूक असणे गरजेचे आहे.
ज्या गोठ्यामध्ये किंवा मालकाकडे म्हशीच्या प्रजनन, दूध उत्पादन इ. निगडित रेकॉर्ड आहे अशाकडून म्हैस खरेदी करणे उत्तम असते.
म्हशीची खरेदीपूर्वी शक्य असल्यास रक्त नमुन्याद्वारे सांसर्गिक गर्भपात इ. रोग निदानाची चाचणी करून घ्यावी.
म्हशीची खरेदी ज्या प्रदेशातून किंवा मालकाकडून करणार आहात तेथून म्हशीचे खाद्य, चारा व संगोपन याबद्दल माहिती जाणून घ्यावी. जेणेकरून तसे संगोपन करणे शक्य होईल जेणेकरून म्हशीच्या दुग्धोत्पादनावर परिणाम जाणवणार नाही.
म्हैस शक्यतो दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेतातील असावी जेणेकरून जास्तीत जास्त वेते पुन्हा मिळू शकतात.
म्हशीची त्वचा मऊ चमकदार तसेच डोळे सतेज व पाणीदार असावेत. नाकपुडीवरील भाग ओलसर असावा.
पाठीचा कणा सरळ असावा तर मान लांब व सडपातळ असावी. पुठ्ठे लांब, रुंद व विस्तृत असावेत, यामुळे गर्भ पोषण चांगले होते, तसेच वासरू अडकण्याचे प्रमाण कमी राहते.
पोटाकडून कासेकडे येणारी रक्तवाहिनी टवटवीत, फुगलेली व मोठी असावी. कासेजवळ अनेक फाटे असावेत. पुढील दोन पायातील अंतर जास्त असावे. यामुळे छाती विस्तारण्यास वाव असतो.
Milk Fat : उन्हाळ्यातही असं टिकवून ठेवा दुधातील फॅट