Anuradha Vipat
दिवाळी पाडव्याच्या म्हणजेच कार्तिक शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी देशभरात गोवर्धन पूजा अतिशय उत्साहाने साजरी केली जाते.
हा सण मुख्यत्वे निसर्ग, पर्यावरण आणि गोधनाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.
गोकुळामध्ये दरवर्षी सर्व गोपाळ आणि ब्रजवासी पाऊस पाडणारे देव 'देवराज इंद्र' यांची मोठी पूजा करत असत.
जेव्हा भगवान श्रीकृष्ण लहान होते, तेव्हा त्यांनी ही पूजा पाहिली आणि आपले वडील नंदबाबा यांना विचारले की, "आपण इंद्राची पूजा का करतो?" नंदबाबांनी सांगितले की, "इंद्रदेव पाऊस पाडतात, ज्यामुळे आपल्याला अन्न आणि गाईंना चारा मिळतो.
त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, "आपण तर जंगलात आणि पर्वतांच्या सानिध्यात राहतो. आपल्याला पाऊस, फळे, औषधी वनस्पती आणि गाईंना चारा देवराज इंद्र नाही, तर हा गोवर्धन पर्वत देतो.
आपल्या उपजीविकेचे खरे साधन गोवर्धन पर्वत आणि आपल्या गाई आहेत. त्यामुळे आपण इंद्राऐवजी गोवर्धन पर्वताची पूजा केली पाहिजे.
श्रीकृष्णाचे बोलणे पटल्यामुळे सर्व ब्रजवासीयांनी इंद्राची पूजा बंद करून गोवर्धन पर्वताची पूजा सुरू केली.