Anuradha Vipat
लक्ष्मी पूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीला तिच्या आवडीचा शास्त्रोक्त नैवेद्य दाखवल्याने घरात कधीही अन्न आणि धनाची कमतरता भासत नाही, अशी धार्मिक मान्यता आहे.
लक्ष्मी पूजनाला प्रामुख्याने लाह्या-बत्तासे, दूध-साखरेची खीर आणि पांढऱ्या रंगाचे गोड पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवले जातात.
धान्यापासून बनवलेल्या लाह्या हे समृद्धीचे प्रतीक मानल्या जातात, तर साखरेचे बत्तासे गोडव्याचे प्रतीक आहेत. हा नैवेद्य ताटात असणे अनिवार्य मानले जाते.
देवी लक्ष्मीला पांढरा रंग आणि दुधापासून बनवलेले पदार्थ अत्यंत प्रिय आहेत.
चंद्र आणि शुक्र ग्रहाशी संबंधित असल्यामुळे देवीला पांढऱ्या मिठाईचा भोग चढवला जातो.
गायीच्या शुद्ध तुपात बनवलेला रव्याचा शिरा किंवा बदाम-काजूचा शिरा देवीला खूप आवडतो.
लक्ष्मी पूजनाला सफरचंद, डाळिंब, सीताफळ, केळी आणि पेरू यांसारखी हंगामी फळे आवर्जून ठेवावीत. विशेषतः डाळिंब आणि सीताफळ देवीला जास्त प्रिय आहेत