Fodder : राज्यात चारा टंचाईचं संकट अधिक तीव्र

Team Agrowon

राज्यात चारा टंचाईचं संकट अधिक तीव्र होऊ लागलं आहे.

Summer Ragi Fodder | Agrowon

परभणी, अहमदनगर जिल्ह्यांच्या पाठोपाठ सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी आंतरजिल्हा चारा वाहतुकीला बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

Animal Fodder | Agrowon

याबद्दलची माहिती जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी दिली. ते म्हणाले, "सध्या जिल्ह्यात टंचाई नाही. पण संभाव्य चारा टंचाई लक्षात घेऊन आंतरजिल्हा चारा टंचाई वाहतूक बंद करण्यात आली आहे."

Animal Fodder | Agrowon

सांगली जिल्ह्यातील जत आणि आटपाडी तालुक्यात पाणी टंचाई जाणवू लागली आहे.

Animal Fodder | Agrowon

या भागातील ७१ जिल्ह्यांना ६७ टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय. दरम्यान संभाव्य चारा टंचाईचं नियोजन करत सांगली जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात चारा घेऊन जाण्यावर बंदी करण्यात आली आहे.

Animal Fodder | Agrowon

यापूर्वी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात परभणी आणि अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आंतरजिल्हा चारा वाहतुकीवर बंदी घातली आहे. 

Azolla Fodder | Agrowon