Aslam Abdul Shanedivan
चवळीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि प्रथिने असतात. तसेच ते लोह, थायामिन, तांबे, फोलेट आणि इतर महत्त्वपूर्ण खनिजांचे उत्कृष्ट स्त्रोत देखील आहे
चवळीतील जीवनसत्त्वे आणि खनिजांव्यतिरिक्त असणारे पॉलिफेनॉल शरीरात पेशींचे नुकसान थांबवण्यासाठी आणि रोगापासून संरक्षण करण्यासाठी अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते.
यातील उच्च फायबर आणि प्रथिने भूक मंदावते. यामुळे पोट भरलेले असल्याची अनुभूती येत असल्याने वजन नियंत्रित करणे सोपे जाते.
लाल चवळीत संतृप्त चरबीचे प्रमाण कमी असते आणि कोलेस्टेरॉल देखील नसते. ज्यामुळे हृदय निरोगी राहून हृदयरोगाचा धोका कमी होतो.
चवळीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढवत नाहीत. यामुळे ते मधुमेहावर उत्कृष्ट पर्याय आहे.
चवळी फायबरचा उत्कृष्ट स्रोत असून याच्या नियमित सेवनाने आतड्याचे आरोग्य चांगले होते. यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचानाचा त्रास कमी होतो.
पॉलिफेनॉल, व्हिटॅमिन ए आणि सी यासह भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असलेले चवळी जुनाट आजारांपासून सूटका करते.